Sadhguru in Muscat
 - थेट प्रसारण in 4दि : 20ता : 32मि
मातीकार्यक्रमसहाय्यकमाहिती
आत्ताच कृती करा
Background

कॉन्शियस प्लॅनेट (जागरूक पृथ्वी)

कॉन्शियस प्लॅनेट (जागरूक पृथ्वी) मोहीम प्रत्येक मनुष्याची चेतना उंचावून सर्वसमावेशक भाव रुजवण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून आपल्या समाजांचे विविध पैलू आणखी जागरूक होऊ शकतील. मानवी कृती निसर्गाशी आणि या धरतीवरच्या सर्व जीवनाशी ताळमेळ साधणारी असावी हा या प्रयत्नांमागचा हेतू आहे. आमचं काम अशी एक धरती निर्माण करण्याचे आहे जिथे मनुष्य मोठ्या संख्येत जागरूकतेने कार्य करतील, सरकार जागरूकपणे निवडलेले असेल आणि जिथे पर्यावरणीय मुद्दे जगभरात निवडणुकीचे मुद्दे बनतील.

आणखी वाचा

माती वाचवा चळवळ या दिशेने अश्या प्रकारे कार्य करेल:

1

जगाचे लक्ष आपल्या नष्ट होणाऱ्या मातीकडे वेधणे.

2

३.५ अब्ज लोकांना मातीचे संरक्षण, पोषण आणि टिकाव, यांसाठी लागणाऱ्या धोरणात्मक बदलांना पाठींबा देण्यासाठी प्रेरित करणे.

3

१९३ देशांमध्ये मातीतील सेंद्रिय घटक किमान ३-६% पर्यंत राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या धोरणात्मक बदलांना चालना देणे.

Soil Revitalization - Global Policy Draft & Solutions Handbook

Read
policy
background
Sadhguru

सद्गुरू

योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी , सद्गुरू आपल्या काळातील सर्वांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. प्रचंड क्षमतांचे आत्म साक्षात्कारी गुरू असून, त्यांनी लोक कल्याणासाठी काही विशाल आव्हाने स्वीकारली आहेत. त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रातले अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.

All his efforts, however, have always been towards just one goal: Raising Human Consciousness. Over the past four decades, Sadhguru has offered the technologies of well-being to millions of people across the world through his foundations, which are supported by over 16 million volunteers worldwide. Sadhguru has been conferred with three presidential awards among which are the Padma Vibhushan for distinguished service to the Nation and India’s highest environmental award, the Indira Gandhi Paryavaran Puraskar, in 2010.

आणखी वाचा

माती वाचवा: एक मोहीम जी २४ वर्षांपूर्वी सुरू झाली

आता तीन दशकांपासून, सद्गुरु सतत मातीचे महत्त्व आणि माती नामशेष होण्याच्या भयावह धोक्याबद्दल बोलत आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार सांगितले आहे: "माती हे आपले जीवन आहे, आपले शरीर आहे. आणि जर आपण मातीला वाळीत टाकले , तर अनेक मार्गांनी आपण या पृथ्वीलाच वाळीत टाकले आहे."

मातीला कोण वाचवेल?

Tree

1990 चा काळ. तामिळनाडूमधील एक खेडेगाव . घनदाट छाया असलेल्या झाडाच्या सावलीत काही लोक डोळे मिटून बसले होते. काही काळापूर्वी, ते उघड्यावर बसले होते, रणरणत्या उन्हात, घाम गाळत. आता, ते विशाल वृक्षाच्या थंडगार सावलीत आल्यावर, त्यांना त्या वृक्षाच्या अस्तित्वाची प्रचंड किंमत आणि वरदान लक्षात आले.

सद्गुरूंनी त्यांना एका आंतरिक प्रक्रियेतून मार्गदर्शित केले, जिथे त्यांनी झाडासोबत श्वासाचे नाते प्रत्यक्ष अनुभवले. झाडाचा उच्छ्वास हाच आपला श्वास आणि आपला उच्छ्वास हाच झाडाचा श्वास असल्याचे त्यांना अनुभवातून जाणवले. या जिवंत अनुभवाने त्यांना स्पष्टपणे जाणवले की आपल्या श्वसन यंत्रणेचा अर्धा भाग तिथे बाहेर आहे. हे ते दिवस होते जेव्हा सद्गुरूंनी सर्वांत अवघड जमिनीवर झाडे लावायला सुरुवात केली होती - ती म्हणजे 'लोकांच्या मनात'! सर्व जीवनासोबत ऐक्याच्या शक्तिशाली अनुभवाने प्रेरित स्वयं सेवकांच्या या पहिल्या समूहाने आपल्या पृथ्वीला वाचवण्याची मोहीम हाती घेतली.

काही हजार स्वयं सेवकांनी १९९० मध्ये वेल्लियंगिरी पर्वतांना हिरवेगार करण्याचे लक्ष ठेऊन वनश्री नावाने सुरू केलेल्या पर्यावरणीय मोहिमेने लवकरच मोठे होऊन प्रोजेक्ट ग्रीन हँड्सचे रूप घेतले, जी २००० च्या पहिल्या दशकात संपूर्ण राज्यभर पसरलेली आणि लाखो स्वयं सेवकांनी चालवलेली तमिळ नाडू मधली मोठी चळवळ बनली. 2017 मध्ये, जेव्हा सद्गुरुंनी नदी अभियानाचे नेतृत्व केले, तेव्हा ती 162 दशलक्ष भारतीयांनी पाठींबा दिलेली पृथ्वीवरील सर्वात मोठ्या पर्यावरणीय चळवळ ठरली. नदी अभियानाच्या मुख्य कल्पनेला प्रत्यक्षात उतरवून 'कावेरी कॉलिंग' या प्रकल्पाद्वारे कावेरी नदीच्या पुनरुज्जीवनाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. आता, जागरूक पृथ्वी निर्माण करण्यासाठी आणि माती वाचवण्यासाठी या अभूतपूर्व चळवळीत कोट्यवधी जागतिक नागरिकांचा समावेश केला जाईल. पृथ्वीवरील ३.५ अब्ज लोकांपर्यंत पोहोचण्याचे सद्गुरूंचे ध्येय तीन दशकांच्या कार्याचे फलित आहे.

या चळवळीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ज्या प्रचंड संख्य्येने तिने लोकांना प्रेरित केले आहे ते खरोखर विलक्षण आहे. पण तितक्याच महत्त्वाचा आहे या मोहिमेच्या प्रभावाचा वाढता स्तर. स्थानिक समुदाय, संस्था, शेतकरी, शाळा आणि राज्य सरकारांकडून, भारतातील राष्ट्रीय नदी धोरणाला आकार देण्यासाठी आणि पर्यावरणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक नेते आणि सरकारांसोबत काम करण्यापर्यंत - या चळवळीने गेल्या तीन दशकांत मोठी झेप घेतली आहे.

'माती वाचवा' अभियान हा लोकशाही जगतातील नागरिकांना मातीच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी आपली बांधिलकी मजबूत करून एका आवाजात बोलण्यासाठी एकत्र आणण्याचा अभूतपूर्व प्रयत्न आहे. जेव्हा पर्यावरणाचे प्रश्न निवडणुकीचे मुद्दे बनतील, जेव्हा लोकांच्या पाठिंब्यामुळे सरकारांना मातीच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन धोरणात्मक बदल स्वीकारण्यास प्रवृत्त करतील, जेव्हा व्यावसायिक संस्था, व्यक्ती आणि सरकार मातीच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देतील - तेव्हाच हे प्रयत्न यशस्वी होतील.

हा हरित-मनांपासून ते हरित-हातांकडे आणि हरित-हातांपासून हरित-हृदयांकडे जाणारा प्रवास आहे. तर माती शेवटी कोण वाचवणार आहे? आपल्यापैकी प्रत्येक जण.

चला, हे घडवून आणूया!

चला, हे घडवून आणूया!

आत्ताच कृती करा
footerLogo

माती

© 2022 Conscious Planet All Rights Reserved

गोपनीयता धोरण

अटी व नियम