५२%
एवढी शेतजमीन आधीच नापीक झाली आहे
माती का वाचवली पाहिजे?
'माती वाचवा' ही जगभरातील मातीची समस्या सोडवण्यासाठी सद्गुरूंनी सुरू केलेली एक जागतिक चळवळ आहे. ही चळवळ मातीच्या आरोग्यासाठी जगातील सर्व लोकांना एकत्र आणून सर्व राष्ट्रांच्या नेत्यांना मातीसाठी राष्ट्रीय धोरणे स्थापित करण्याचे आवाहन करत आहे. मातीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढवण्यासाठी ही धोरणे जगातील सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
माती वाचवा संदेश
The Save Soil movement has been initiated by Sadhguru, a yogi, mystic and visionary.
संकट
मातीतील सेंद्रिय घटकांच्या अभावामुळे मातीचे रुपांतर वाळू मध्ये होते, ज्यामुळे:
अन्न टंचाई
येत्या 20 वर्षांत, ९.३ अब्ज लोकांसाठी आपण आतापेक्षा ४०% कमी अन्न निर्माण करू.
निकृष्ट माती म्हणजे निकृष्ट दर्जाचे पोषण. आजच्या फळं आणि भाज्यांमध्ये आधीच ९०% कमी पोषणतत्त्वे आहेत.
२ अब्ज लोक पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे अनेक रोगांचा सामना करत आहेत.
पाणी टंचाई
नापीक माती पाणी शोषून पाण्याचा प्रवाह नियमित करू शकत नाही.
पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने पाणी टंचाई, दुष्काळ आणि पूर यांसारख्या आपत्ती उद्भवतात.
सेंद्रिय घटक असलेली माती तिच्या वजनाच्या ९०% एवढे पाणी धरून ठेऊ शकते आणि ते हळूहळू सोडू शकते. दुष्काळग्रस्त भागांसाठी हे एक मोठी मदत ठरते.
जैव विविधेतेचे (बायो डायव्हरसिटी) नुकसान
वैज्ञानिक सांगत आहेत, की दरवर्षी विविध जीवांच्या जवळपास २७००० प्रजाती त्यांचे मूळस्थान नष्ट होत असल्यामुळे नामशेष होत आहेत.
या संकटाने अशी पातळी गाठली आहे, की ८०% कीटक बायोमास (इंसेक्ट बायोमास) नष्ट झाले आहे.
जैव विविधता (बायो डायव्हरसिटी) गमावल्यामुळे, मातीचे मूळस्वरुप विस्कळीत होते आणि पुनरुज्जीवनाची क्षमता निघून जाते.
वातावरण बदल
मातीमध्ये साठवलेला कार्बन जिवंत वनस्पतींच्या ३ पट आहे आणि वातावरणाच्या 2 पट आहे. याचा अर्थ हवेतला कार्बन कमी करण्यासाठी, माती अत्यंत महत्त्वाची आहे.
जर जगातील माती पुनरुज्जीवित झाली नाही, तर त्यामुळं ८५० अब्ज टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात पसरेल ज्यामुळे हवामान बदलाचा धोका संभवतो. हे मानवाने गेल्या ३० वर्षांत केलेल्या सर्व उत्सार्जनापेक्षा जास्त आहे.
उदरनिर्वाहाच्या साधनांचे नुकसान
माती निकृष्ट होत चालल्यामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत.
जगभरातील ७४% गरीब लोकसंख्या मातीच्या हानीमुळे थेट प्रभावित झाली आहे.
असा अंदाज आहे, की माती नामशेष होत चालल्यामुळे जगाला दरवर्षी १०.६ ट्रीलियन अमेरिकन डॉलर एवढा तोटा होत आहे.
संघर्ष आणि स्थलांतर
२०५० पर्यंत, लोकसंख्येतील वाढ आणि अन्न आणि पाणी टंचाईमुळे १ अब्ज लोकांना इतर देशांमध्ये स्थलांतरीत व्हावे लागू शकते.
1990 पासून आफ्रिकेतील ९०% पेक्षा अधिक युद्धांमध्ये आणि संघर्षांमध्ये जमिनीच्या समस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
फ्रेंच क्रांती पासून ते अरब स्प्रिंग पर्यंत, अन्न खाद्याचे वाढते दर मोठ्या हिंसक चळवळींसाठी कारणीभूत ठरलेले आहेत.
सजीव माती
उपाय
मातीत किमान ३ ते ६% सेंद्रीय घटक परत आणा.
जमीन वृक्षांच्या छायेखाली आणणे आणि पालापाचोळा व प्राण्यांच्या विष्ठेने माती समृद्ध करणे.
समृद्ध, जिवंत माती जीवनासाठी आवश्यक आहे.
योजना
मातीचे आरोग्य
सहाय्यक धोरणांची प्रत्येक राष्ट्राला गरज आहेधोरणे
जनतेच्या पाठिंब्याची आवश्यकता आहेजनतेचा पाठिंबा
जागरूकतेची आवश्यकता आहेधोरणे महत्त्वाची का आहेत?
अधिक माहिती
कृती
हा संदेश ३.५ अब्ज लोकांपर्यंत पोहोचवा,
जगातील 60% मतदार
माती वाचवण्याचा एक प्रवास
Sadhguru has embarked on a journey to meet citizens, leaders and experts as a lone motorcyclist covering 30,000 km across 25 nations from the United Kingdom to India in 100 days.
आगामी कार्यक्रम
Sadhguru in Muscat - Oman Convention and Exhibition Centre,
Wed, May 25 19:00 - 21:00 GST
सहाय्य करणाऱ्या लोकांकडून ऐका
मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करण्याच्या या एका ध्येयाने हजारो प्रतिष्ठित लोक आणि संस्था एकत्र येत आहेत.
सहाय्यक संस्था
मी काय करू शकतो??
मातीचा आवाज व्हा!
शक्य त्या पद्धतीने जगाला मातीबद्दल बोलण्यासाठी उद्युक्त करा
मिडिया मध्ये
#SaveSoil #मातीवाचवा
चला, हे घडवून आणूया!